दुर्लक्षित पुर्वांचल तरीही प्रेमळ पुर्वांचल ♥️
पुर्वांचलात नशिबाने नागालँड आसाम मेघालय अरुणाचल या राज्यात फिरण्याचा योग आला...
तिथले खानपान , वेशभूषा , वातावरण हे महाराष्ट्रापेक्षा खूपच वेगळे आहे. टुव्हिलर वर फिरत असल्याने गावातील वातावरण , माणसं जवळून पाहता आले.भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत इथे आर्थिक प्रश्न खूप गंभीर आहेत.मिशनऱ्यांचे जाळे आठही दिशांना पसरलेले आहे.आता हेच बघा ना एका रविवारी आम्ही नागालँड मध्ये होतो , आदल्या दिवशी समजले कि उद्या बाजार बंद असतो.फक्त जीवनावश्यक वस्तूंचे दुकानं उघडे असतात.आम्हाला वाटले की फक्त शहरात असे असेल म्हणून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.पण संपूर्ण दिवसभराच्या प्रवासात साधा चहा पण नाही मिळाला.रविवारी सगळे चर्चमध्ये जातात , सुट्टीचा वारी अशाप्रकारे कडकडीत बंद पाळणारे पहिल्यांदाच पाहिले.पण सुट्टी कसली तर चर्चमध्ये जाऊन देवाची प्रार्थना करण्यासाठी.इतकी कट्टरता तर मी मालेगावात पण पाहिली नाही.व्यवसायाचे नुकसान झाले तरी आम्ही धर्माचे रितीरिवाज सोडणार नाही.
खूप प्रेमळ स्वभावाची माणसे या राज्यांमध्ये राहतात.पूर्णपणे मातृसत्ताक पद्धती असलेली ही राज्ये.सगळी कडे मुक्तपणे महिलांचा वावर असतो.खूप मानसन्मान महिलांना इथे असतो.त्यामुळे एकुणच महिला सक्षमीकरण , सबलीकरण हे मुद्दे इथे लागू होत नाही.येणाऱ्या पर्यटकांना आदराची वागणूक दिली जाते.लग्न झाल्यावर मुलगा मुलीच्या घरी जातो.घरातील लहान मुलीला खूप मान असतो.पुरुषांमध्ये लहानपणापासून व्यसनाधीनतेचे प्रमाणे जास्त आहे.
विशेष उल्लेख करावासा वाटतो तो नागालँड आणि मेघालयातील वाहतूक शिस्तीचा. दोन्ही राज्यात कुठेही ट्राफिक सिग्नल नाहीत आणि तुलनेने वाहने जास्त, वाहने जास्त कारण घरातील प्रत्येकाकडे वाहन. थंडी भरपूर असल्याने दुचाकीपेक्षा चारचाकी तुन फिरणारे जास्त. पण उगाच वाकडीतीकडी गाडी चालवून सगळे ट्राफिक जाम केलंय असे कधी पाहायला मिळाले नाही, दुचाकीला मधून निवांत निघून जाता येते. त्यात कोणाची आडकाठी येत नाही.
खानपानाचा विचार केला तर जे चालते , उडते , पळते , पोहते ते सगळं इथे कमी अधिक प्रमाणात खाल्ले जाते.निसर्गातील सगळ्याच गोष्टी या मनुष्याच्या खाण्यासाठी नाही हे त्यांना लक्षात येत नाही.याचे मुख्य कारण म्हणजे अन्य जगाशी संपर्क कमी आहे.आर्थिक समस्या खूप आहे.शेतीसाठी सपाटीवरील जागेची कमतरता.तापमान पण याचे एक कारण असू शकते.आणि मुख्य म्हणजे चर्चवर आंधळा विश्वास , मिशनऱ्यां कडून सांगितले जाते की हे सगळे तुमचे आहे , तुम्ही याचे मालक आहात जसं वापरायचे तसे वापरा.यावर आपले स्वयंसेवक काम करीत आहेत ,जिथे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण करून अगदी निबिड अशी आरण्य बनवली ती अशा प्रकारे ओरबाडून संपवली तर हा निसर्ग नष्ट होईल, याबद्दल जनजागृती होणे अतिशय महत्वाचे आणि त्याच अनुषंगाने स्वयंसेवक काम करीत आहेत.
उर्वरित भारताशी हे राज्ये जोडली जावीत म्हणून केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी आणि त्यांच्या खात्यातील सहकारी खूप कष्ट घेत आहेत.खूप सुंदर रस्ते या ठिकाणी निर्माण झाले किंवा होत आहेत.देशातील सर्वात लांब पूल ( भुपेन हजारीका पुल , अरुणाचल ) या राज्यात आहे.मागच्या वर्षी याचे उद्घाटन झाले. नागालँड सोडले तर सगळीकडे अप्रतिम रस्ते विकास झालेला आहे. नागालँड मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर रस्ते बनत असल्याने जरासा त्रास झाला.पण येत्या वर्ष-दोन वर्षात चांगले रस्ते होतील. ( लालुप्रसाद यादव यांचा डायलॉग आठवला " माधुरीच्या गाला प्रमाणे रस्ते.) यामुळे एकतर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.आणि मुख्य म्हणजे सैन्याच्या हालचाली वेगात होतील.चीनचे संकट देशावर घोंघावत असताना अशा प्रकारे सीमावर्ती भागात रस्ते बांधणी खूप उपयोगी पडणार आहे.त्यामुळे मा.पंतप्रधान मोदीजी , मा.नितीनजी आणि सर्व सहकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद....🙏
अशा या सुंदर राज्यांना भेटी देताना dzuku valley, bamboo trek, dwaki नदी, परशुराम कुंड या गोष्टी आवर्जून पहाव्यात त्याच बरोबर तिथल्या समाजात मिसळून एखादा उत्सव, कार्यक्रम जरून enjoy करावा. आपलेपणाची भावना काय चमत्कार घडवेल काही सांगता येत नाही.
इथल्या संघ कामाचा विचार केला तर आपल्या सारखे अनुकूल वातावरण इथे नाही.ठीकठीकाणी तुम्हाला विरोध होणार हे गृहीत धरून वाटचाल करावी लागते.इथे असलेल्या सर्व आदरणीय प्रचारकां विषयी तर बोलायलाच शब्द नाही.गुवाहाटी कार्यालयात भेटलेले ज्येष्ठ प्रचारक आदरणीय भास्करराव कुलकर्णी , हि व्यक्ती त्यांच्या तारुण्यात या भागात आली आणि इथलीच होऊन गेली.आम्ही भेटायला गेलो तर कुटुंबातील आजोबांसारखी विचारपूस केली.काय काय काळजी घ्यायची हे सांगितले.कुठे पाहण्यासारखी ठिकाणे आहेत ते सांगितले.आणि प्रत्येक प्रचारक सांगतात त्याप्रमाणे सुचनाही केली कि फक्त फिरु नका , गावात जा , लोकांशी संवाद साधा , परिसराची माहिती घ्या अशा अनेक सुचना दिल्या.प्रवास संपवून परतीला लागताना भेटायला गेलो तर पहिले तब्बेतीची आस्थेने चौकशी केली आणि मग काय काय पाहिलं , कसं वाटलं हे विचारले.
अरुणाचल मध्ये तिथले प्रचारक आणि प्रांत बौद्धिक प्रमुख आदरणीय दिपकजी बोराडे भेटले , हे तसे अकोला , विदर्भातील.आम्ही येणार म्हणून प्रवासात न जाता आमची वाट बघत कार्यालयात थांबले होते.थोडा उशीर झाला तर लगेचच फोन करून कुठे आहात याची चौकशी केली.( या राज्यांमध्ये सगळीकडे मोबाईलला रेंज असते.) कार्यालयात गेल्यावर गाडीचा आवाज ऐकून धावत खाली आले आणि आमचे स्वागत केले.( तेजु नावाच्या शहरात आम्ही गेलो होतो. ) वरती गेल्यावर आंघोळीसाठी गरम पाणी दिले.शहरात फिरवून आणले.प्रचारकी स्टाईल मध्ये सगळी माहिती दिली.रात्री स्वतःच्या हाताने जेवण बनवून खायला घातले.ज्या प्रकारे घरात आई काळजी घेते त्याच प्रमाणे काळजी घेतली.रात्री थंडी वाजु नये म्हणून झोपेत अंगावर रजई टाकली.सकाळी आम्ही रस्ता चुकु नये म्हणून मुख्य रस्त्याला सोडायला आले.इतकी आपुलकी , प्रेम घरात पण मिळणार नाही.
शिलॉंगला गेल्यावर तिथले प्रचारक आदरणीय प्रविणजी शेवाळे भेटले.ते पण आमची वाट बघत होते , सारखे फोन करून कुठं पर्यंत आलात याची चौकशी करीत.आमच्यासाठी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात पण दोन दिवस आमच्या सोबत राहिले.आजही फोन आलेला ( हे मी परतीच्या प्रवासात लिहित आहे.) घरी कधी पोहचणार म्हणून आणि पोहचला कि फोन कर असा दम पण दिला.
खरं तर मी आणि प्रविणने प्रचारकी जीवनाची सुरुवात एकत्र केली. हे जीवन अधिक काळ जगण्याचे भाग्य मला नाही लाभले पण प्रविण कडे पाहून आनंद वाटतो.प्रविण दरवर्षी घरी आला की मला भेटतोच त्यामुळे पुर्वांचलातील संघ कामाची माहिती मिळते आणि त्याच बरोबर वीणाताई बेडेकर ज्या मणिपूर मध्ये पूर्णवेळ काम करतात त्यांनी पण गप्पांमध्ये या भागाची माहिती दिलेली पण यावेळी प्रत्यक्षात याचे दर्शन घडले.
तिथले सगळे आदरणीय प्रचारक आणि कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा.....🙇
खूप साऱ्या आठवणी सांगण्या सारख्या आहेत.पुन्हा कधीतरी लिहीन.तिथले अनुभव मनात साठवून पुन्हा नव्याने अनुभव घेण्यासाठी येण्याची शपथ घेऊन थांबतो.....
लवकरच भेटू.....
धन्यवाद 🙏
ता.क. या खरे तर ज्यांच्यामुळे हे सगळे अनुभवता आले अशा निलेशजींचा उल्लेख करावा लागेल.....
निलेश लाळे हे माझ्या सोबत प्रचारक होते. 2017 पासून संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले.काही कारणांमुळे यावर्षी थांबले.
त्यांनी आमचे सगळे नियोजन केले होते.मला फक्त फिरायला जायचे होते पण निलेश एक महिन्यांपासून याची तयारी करीत होता. उत्कृष्ट नियोजन काय असते याचा अनुभव मी घेतला.....
धन्यवाद निलेश तुझ्यामुळे हे शक्य झाले.....♥️
( क्रमशः )
🙏
उत्तर द्याहटवाछान...
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा