महिला सुरक्षा एक मृगजळ २
#Khuda_Haafiz ( Chapter 2 Agni Pariksha...) पाहतोय.... या पिक्चरचा पहिला पार्ट पण पाहिला होता.... ( #A_Thursday पण याच विषयावरील चित्रपट ) या देशात महिला सुरक्षीत नाही हे पिक्चर्सच्या माध्यमातून , महिला सुरक्षा या विषयावर काम करणाऱ्या संघटना/संस्था नेहमीच आवाज उठवत असतात... पण... या देशातील देशवासी इतके ढाराढूर झोपले आहेत की पिक्चर्स असो किंवा संस्था/संघटनेचे कर्णकर्कश आवाज यांच्या कानावर पडतच नाहीत..... महिलांवरील अत्याचारांच्या गुन्हेगाराला या देशात नेहमीच राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून त्या गुन्हेगारांना नेहमीच #राजाश्रय दिला आहे.... या देशात छोट्या निरागस बाळांपासून तर आजीच्या वयाच्या महिलेवर या नराधमांनी अत्याचार केले आहेत आणि या मुर्दाड नागरीकांच्या देशात हे यापुढेही घडतच राहणार.... या देशातील #कायदा म्हणजे या गुन्हेगारांच्या आणि त्यांचे #वकीलपत्र घेणाऱ्या #पैशासाठी_हपापलेल्या वकीलांच्या हातातील खेळणेच बनले आहे.... वकीलपत्र घेणाऱ्या वकीलाला माहिती असते की आपण ज्याचे वकील पत्र घेत आहोत तो किती हरामखोर आहे , पण नोटांची बंडले त्यांची दृष्टी घालवतात.......