" महिला सुरक्षा " - एक मृगजळ
भारतात शेकडो वर्षांपासून " महिला सुरक्षा " हा विषय काळजीचा राहिला आहे.१९४७ पुर्वी परकीय आक्रमणापासून महिला सुरक्षित नव्हती आणि १९४७ नंतर स्वकीयांपासून सुरक्षित नाही.अनेक पूजनीय महिलांनी स्त्री सबलीकरण - सक्षमीकरण - सुरक्षा यासाठी संघर्ष केलेला आपल्याला माहिती आहे.यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे.देश परकीय सत्तेतून मुक्त झाल्यानंतर देशात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत " महिला सुरक्षा " हा विषय फक्त मत मिळविण्यासाठी प्रकर्षाने मांडला गेला.कठोर कायदे फक्त कागदावरच लिहिले गेले.त्याची नीट अंमलबजावणी न झाल्याने त्या कायद्याच्या विषयी मनात भीती निर्माण झाली नाही.त्यामुळे दरवर्षी देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.आत्ता पण लग्नाचे वय वाढविणारा कायदा येऊ घातला आहे.यामुळे लवकर लग्न न होता. मुलीला तिच्या आवडत्या क्षेत्रात चांगले शिक्षण घेता येईल आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावता येईल..... पण.... " महिला सुरक्षा " देशासाठी मृगजळ ठरणार का....? भारतीय पुरुष आपल्या पुरुषी अहंकाराचा विचार सोडू शकतो का...? भारतीय सरकारच्या येणाऱ्या नवीन क...