पोस्ट्स

अहिल्यानगरचा पतंग महोत्सव

*माझं अहिल्यानगर* *संक्रांत आली की नगरचे पतंग आठवतात!* *नगरमधे तयार झालेले खास नगरी पतंग आज* *बघायला सुद्धा मिळत नाही*.                   *नगरमधील*                   *पतंग उत्सव*  काटला रे काटला! लांब नेऊन काटला! काय भारी मांजा आहे रे तुझा!  मग! आता पर्यंत पाच काटले आहेत...! *नगर म्हणजे पतंग व पतंग म्हणजे नगरच* *इतके घट्ट नाते पतंग आणि नगरचे आहे*.  दिवाळी नंतर हळूहळू आकाशात पतंग दिसायला सुरूवात होत असे.....! नगर म्हणजे वाडे,उंच इमारती,जवळजवळ घरे, लांबलचक गच्च्या,उंच माळवदं मोठया पत्र्याच्या शेड,मोठी मैदान,रस्ते असा नगरचा सगळा  पसारा असायचा....   पतंगचा सिझन आला की या प्रत्येक  ठिकाणाहून पतंग उडवले जायचे.. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यत पतंग उडवण्याचा शौक सगळ्यांनाच असायचा.... पावसाळा संपला की वातावरणात एक वेगळा उत्साह असायचा... हवेतील ओल निघून गेलेली असायची.  साधारणपणे दिवाळी नंतर नगरमधे पतंग उडवायचे वेध लागायला सुरूवात व्हायची... पतंग उडवायल...

महिला सुरक्षा एक मृगजळ २

#Khuda_Haafiz ( Chapter 2 Agni Pariksha...) पाहतोय.... या पिक्चरचा पहिला पार्ट पण पाहिला होता.... ( #A_Thursday  पण याच विषयावरील चित्रपट ) या देशात महिला सुरक्षीत नाही हे पिक्चर्सच्या माध्यमातून , महिला सुरक्षा या विषयावर काम करणाऱ्या संघटना/संस्था नेहमीच आवाज उठवत असतात... पण... या देशातील देशवासी इतके ढाराढूर झोपले आहेत की पिक्चर्स असो किंवा संस्था/संघटनेचे कर्णकर्कश आवाज यांच्या कानावर पडतच नाहीत..... महिलांवरील अत्याचारांच्या गुन्हेगाराला या देशात नेहमीच राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून त्या गुन्हेगारांना नेहमीच #राजाश्रय दिला आहे.... या देशात छोट्या निरागस बाळांपासून तर आजीच्या वयाच्या महिलेवर या नराधमांनी अत्याचार केले आहेत आणि या मुर्दाड नागरीकांच्या देशात हे यापुढेही घडतच राहणार.... या देशातील #कायदा म्हणजे या गुन्हेगारांच्या आणि त्यांचे #वकीलपत्र घेणाऱ्या #पैशासाठी_हपापलेल्या वकीलांच्या हातातील खेळणेच बनले आहे.... वकीलपत्र घेणाऱ्या वकीलाला माहिती असते की आपण ज्याचे वकील पत्र घेत आहोत तो किती हरामखोर आहे , पण नोटांची बंडले त्यांची दृष्टी घालवतात.......

" महिला सुरक्षा " - एक मृगजळ

इमेज
भारतात शेकडो वर्षांपासून " महिला सुरक्षा " हा विषय काळजीचा राहिला आहे.१९४७ पुर्वी परकीय आक्रमणापासून महिला सुरक्षित नव्हती आणि १९४७ नंतर स्वकीयांपासून सुरक्षित नाही.अनेक पूजनीय महिलांनी स्त्री सबलीकरण - सक्षमीकरण - सुरक्षा यासाठी संघर्ष केलेला आपल्याला माहिती आहे.यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे.देश परकीय सत्तेतून मुक्त झाल्यानंतर देशात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत " महिला सुरक्षा " हा विषय फक्त मत मिळविण्यासाठी प्रकर्षाने मांडला गेला.कठोर कायदे फक्त कागदावरच लिहिले गेले.त्याची नीट अंमलबजावणी न झाल्याने त्या कायद्याच्या विषयी मनात भीती निर्माण झाली नाही.त्यामुळे दरवर्षी देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.आत्ता पण लग्नाचे वय वाढविणारा कायदा येऊ घातला आहे.यामुळे लवकर लग्न न होता. मुलीला तिच्या आवडत्या क्षेत्रात चांगले शिक्षण घेता येईल आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावता येईल..... पण.... " महिला सुरक्षा " देशासाठी मृगजळ ठरणार का....? भारतीय पुरुष आपल्या पुरुषी अहंकाराचा विचार सोडू शकतो का...? भारतीय सरकारच्या येणाऱ्या नवीन क...

दुर्लक्षित पुर्वांचल तरीही प्रेमळ पुर्वांचल ♥️

 पुर्वांचलात नशिबाने नागालँड आसाम मेघालय अरुणाचल या राज्यात फिरण्याचा योग आला...    तिथले खानपान , वेशभूषा , वातावरण हे महाराष्ट्रापेक्षा खूपच वेगळे आहे. टुव्हिलर वर फिरत असल्याने गावातील वातावरण , माणसं जवळून पाहता आले.भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत इथे आर्थिक प्रश्न खूप गंभीर आहेत.मिशनऱ्यांचे जाळे आठही दिशांना पसरलेले आहे.आता हेच बघा ना एका रविवारी आम्ही नागालँड मध्ये होतो , आदल्या दिवशी समजले कि उद्या बाजार बंद असतो.फक्त जीवनावश्यक वस्तूंचे दुकानं उघडे असतात.आम्हाला वाटले की फक्त शहरात असे असेल म्हणून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.पण संपूर्ण दिवसभराच्या प्रवासात साधा चहा पण नाही मिळाला.रविवारी सगळे चर्चमध्ये जातात , सुट्टीचा वारी अशाप्रकारे कडकडीत बंद पाळणारे पहिल्यांदाच पाहिले.पण सुट्टी कसली तर चर्चमध्ये जाऊन देवाची प्रार्थना करण्यासाठी.इतकी कट्टरता तर मी मालेगावात पण पाहिली नाही.व्यवसायाचे नुकसान झाले तरी आम्ही धर्माचे रितीरिवाज सोडणार नाही. खूप प्रेमळ स्वभावाची माणसे या राज्यांमध्ये राहतात.पूर्णपणे मातृसत्ताक पद्धती असलेली ही राज्ये.सगळी कडे मुक्तपणे महिलांच...