महिला सुरक्षा एक मृगजळ २
#Khuda_Haafiz ( Chapter 2 Agni Pariksha...)
पाहतोय....
या पिक्चरचा पहिला पार्ट पण पाहिला होता....
( #A_Thursday पण याच विषयावरील चित्रपट )
या देशात महिला सुरक्षीत नाही हे पिक्चर्सच्या माध्यमातून , महिला सुरक्षा या विषयावर काम करणाऱ्या संघटना/संस्था नेहमीच आवाज उठवत असतात...
पण...
या देशातील देशवासी इतके ढाराढूर झोपले आहेत की पिक्चर्स असो किंवा संस्था/संघटनेचे कर्णकर्कश आवाज यांच्या कानावर पडतच नाहीत.....
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्हेगाराला या देशात नेहमीच राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून त्या गुन्हेगारांना नेहमीच #राजाश्रय दिला आहे....
या देशात छोट्या निरागस बाळांपासून तर आजीच्या वयाच्या महिलेवर या नराधमांनी अत्याचार केले आहेत आणि या मुर्दाड नागरीकांच्या देशात हे यापुढेही घडतच राहणार....
या देशातील #कायदा म्हणजे या गुन्हेगारांच्या आणि त्यांचे #वकीलपत्र घेणाऱ्या #पैशासाठी_हपापलेल्या वकीलांच्या हातातील खेळणेच बनले आहे....
वकीलपत्र घेणाऱ्या वकीलाला माहिती असते की आपण ज्याचे वकील पत्र घेत आहोत तो किती हरामखोर आहे , पण नोटांची बंडले त्यांची दृष्टी घालवतात....
उद्या उठून हे #नराधम त्याच वकिलांच्या घरातील #मातृशक्ती वर पण हात घालणार आहेत , हे या कायद्याच्या खोट्या रक्षकांनी लक्षात घ्यावे....
पोलिस आणि राजकीय नेत्यांनी तर #सोयरीकच केली आहे , राजकीय नेत्यांनी किंवा त्यांच्या चेल्या-चपाट्यांनी गुन्हा करायचा आणि पोलिसांनी त्यांना #स्वातंत्र्यसैनिक असल्या सारखी वागणूक द्यायची....
#सिंघम सारखे कितीही चित्रपट निघाले तरी #पोलीसांची_प्रतिमा काही बदलणार नाही....
मागच्या आठवड्यात रात्री सोलापूर-पुणे प्रवास करीत होतो , तेव्हा गाडीत एक जण दारु पिऊन दंगा करीत होता...
काही महिलांनी #भिगवण मध्ये गाडी आल्यावर तक्रार केली म्हणून बस ड्रायव्हरने गाडी #पोलिस_चौकी त नेली...
तिथल्या पोलिसांनी स्थानिक काही तरुणांना गाडीत पाठवले.आलेल्या त्या तरुणांनी त्याला दोन-चार फटके दिले आणि गाडीत बसलेल्या आम्हा सगळ्यांना मस्त #बौद्धिक दिले.मी त्यांना म्हणालो की मी लेखी तक्रार देतो पोलिसांना गाडीत पाठवा पण ना पोलिस गाडीत चढले ना ही माझी तक्रार घेतली.त्यांचे म्हणणं होतं की आम्ही कुठे रात्रभर सांभाळत बसू.परत त्रास दिला तर सरळ मारा तुम्ही त्याला. यात एक गोष्ट लक्षात आली नाही त्यांच्या एकतर तो दारू पिलेला होता , जर कुठे कमी जास्त लागले तर याला #जबाबदार कोण ?
या देशातील नागरिकांना स्वतःच्या बाबतीत जो पर्यंत काही घडत नाही तोपर्यंत त्याला समाजाशी काहीही घेणे देणे नसते आणि ज्यांच्या हातात नागरीकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे अशा पोलिसांनी जर हात वर केले तर या देशातील #महिला कशा सुरक्षित राहतील....
त्यामुळे #महिला_सुरक्षा या देशात #चुनावी_जुमला बनला आहे....
निवडणुकीच्या काळात फक्त या देशातील सर्व #राजकीय_पक्ष गळा फाडून #पोटतिडकीने महिला सुरक्षा विषयावर जोरदार भाषणं ठोकत असतात...
निवडणुकीचे निकाल जाहीर झाले की #वाचा_गेल्यासारखे मौनात जातात....
त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ च काय १७५ वर्ष झाले तरीही या देशातील महिला सुरक्षीत राहणार नाहीत...
त्यामुळे देशातील नागरिकांना आपली #कुंभकर्णाची_झोप सोडून आपल्याच नाही तर देशातील प्रत्येक #माता_भगिनींची_सुरक्षा करावी लागणार आहे....
घरात स्वतःच्या आई_बहिणीचा सन्मान करायला जसे शिकवतात तसे दुसऱ्याच्या #आई_बहिणींचा पण #सन्मान करायला शिकवले पाहिजे.आपल्या मुलांना आपण चांगल्या शाळेमध्ये शिकायला पाठवतो.तिथे तो चांगली डिग्री घेतो पण त्यांच्या #चांगल्या_चारित्र्याचे शिक्षण फक्त #घरातील_संस्कारात मिळणार आहे....
नाहीतर या देशात #महिला_सुरक्षा_एक_मृगजळ असेच म्हणावे लागेल.....
महिला सुरक्षा एक मृगजळ ( २ )
युवराज ✒️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा